English  |  मराठी 
 
     
  शनिवारी विज्ञानवारी उपक्रम  
 

विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध असणारे आणि अत्यंत कमी खर्चिक असणारे साहित्य वापरून करता येणाऱ्या प्रयोगांच्या माध्यमांतून अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पना रंजकतेने शिकण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेमार्फत आखण्यात आलेला हा एक अभिनव उपक्रम असून मराठी विज्ञान परिषदेच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थी गटामध्ये प्रत्यक्ष कृती करून शिकतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होऊन त्यांचे सक्षमीकरण साध्य करणारा हा अभिनव उपक्रम आहे.

हेमंत लागवणकर यांनी या उपक्रमाची संकल्पना विकसित केली असून त्यांनी २०१६ ते २०२० या कालावधीत या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्य पहिले; तर मराठी विज्ञान परिषदेचे तत्कालीन कार्यवाह डॉ. जयंत जोशी हे उपक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते.

 
  हा उपक्रम सर्वप्रथम पथदर्शी स्वरूपात २०१६ - १७ या शैक्षणिक वर्षात नाशिक येथील १२ शाळांमधून राबविण्यात आला. यासाठी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना या उपक्रमासाठी प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रयोगसाहित्य संच देऊन प्रयोगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना रंजकतेने कशा स्पष्ट करायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले.  
 

प्रशिक्षित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दोन-दोनच्या गटांत विभागणी केली गेली आणि प्रत्येक गटाला एकेक शाळा नेमून देण्यात आली. प्रत्येक गटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या शाळेत शनिवारी जाऊन प्रत्येकी दीड ते दोन तासांची एकूण १० कृतीसत्रे घेतली. या कृतीसत्रांमधून वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष कृती आणि प्रयोगांच्या माध्यमातून इयत्ता ६ वी-७वी च्या शालेय विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याची संधी देण्यात आली.

 
  बारा शाळांमधून घेण्यात आलेल्या या संपूर्ण उपक्रमाची पाहणी करण्यात आली आणि वेळोवेळी आढावा घेण्यात आला. यातूनच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आणि विद्यार्थ्यांना आवडत असल्याचे आढळून आले. या उपक्रमाचा लगेच दिसलेला परिणाम म्हणजे ज्या शाळांमधून हा उपक्रम घेण्यात आला त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. इयत्ता ६वी - ७वीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांनी विज्ञान प्रयोग करण्यासाठी आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून स्वत:चे प्रयोगसंच तयार केले.  
 

(२०१६-१७ या वर्षी घेण्यात आलेल्या पथदर्शी उपक्रमाचा अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(मराठी विज्ञान परिषदेच्या 'पत्रिका' मासिकातील वृतांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

 
 
 
 
 
 
  उपक्रमाचे विस्तारीकरण  
  पथदर्शी स्वरूपात घेण्यात आलेल्या या उपक्रमाला शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यामुळे २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षात 'शनिवारी विज्ञानवारी' या उपक्रमाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.  
 

दुसऱ्या वर्षी नाशिकबरोबरच हा उपक्रम मुंबई आणि नंदुरबार येथील शाळांमधून यशस्वीरित्या राबविण्यात आला. २०१७ - १८ या वर्षी हा उपक्रम एकूण ५० शाळांमधून घेण्यात आला.

२०१७ - १८ या वर्षात घेण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल वाचण्यासाठी क्लिक करा : (मराठी) | (इंग्रजी)

 
 

२०१८ - १९ या शैक्षणिक वर्षात 'शनिवारी विज्ञानवारी' हा उपक्रम महाराष्ट्रात ११ ठिकाणी आणि कर्नाटकातल्या बेळगावी जिल्ह्यातील निपाणी येथे यशस्वीपणे घेतला गेला.

एकूण १६६ शाळांमधून घेण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी विज्ञान भवन (मराठी विज्ञान परिषद), सोलापूर आणि धुळे या तीन ठिकाणी दोन दिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात आल्या.

२०१८ - १९ या वर्षात घेण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल वाचण्यासाठी क्लिक करा : (मराठी) | (इंग्रजी)

 
 
 

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने श्रीमती उमा दीक्षित ह्यांनी हेमंत लागवणकर यांची 'शनिवारी विज्ञानवारी' उपक्रमासंदर्भात आकाशवाणी, मुंबई केंद्रासाठी विशेष मुलाखत घेतली.

ही मुलाखत २८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी आकाशवाणी, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 'वनिता मंडळ' या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात आली.

ही मुलाखत ऐकण्यासाठी क्लिक करा -> 'शनिवारी विज्ञानवारी' उपक्रमासंदर्भातील आकाशवाणीवरील मुलाखत

 
 

२०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये 'शनिवारी विज्ञानवारी' हा उपक्रम मविप मध्यवर्तीमार्फत महाराष्ट्रात मुंबई, देवळा, शिरसोंडी, मालेगांव, चांदवड, धुळे, फलटण, उमरी, रत्नागिरी, सांगोला, साक्री, अंबाजोगाई, चाळीसगांव, जालना, जळगांव, आजरा, अमरावती, चंदगड, अंबरनाथ, गडहिंग्लज, कोल्हापूर, वारणानगर, बिद्री, पानगांव, पुणे, पंढरपूर, बार्शी, सोलापूर आणि ईशान्य मुंबई अशा एकूण २९ ठिकाणी आणि कर्नाटकात बेळगावी जिल्ह्यातील निपाणी इथे यशस्वीपणे घेतला गेला.

या वर्षात ५७५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकूण २९६ शाळांमधून ‘शनिवारी विज्ञानवारी’ उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आणि बारा हजारांपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. २९६ शाळांपैकी ६६ शाळा ह्या महानगरपालिकेच्या अथवा जिल्हा परिषदेच्या होत्या.

२०१९ - २० या वर्षात घेण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल वाचण्यासाठी क्लिक करा : (मराठी) | (इंग्रजी)

 
     
  खालील जिल्ह्यांत 'शनिवारी विज्ञानवारी' उपक्रम पोहोचला -  
   
     
  शनिवारी विज्ञानवारी उपक्रमाची आकडेवारी  
  वर्ष २०१६ - १७  
 
  क्र. ठिकाण सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या उपक्रमात समाविष्ट शाळांची संख्या समाविष्ट शाळांतील वर्गांची संख्या उपक्रमात समाविष्ट शासकीय शाळांची संख्या शाळांमधून घेण्यात आलेल्या कृतीसत्रांची संख्या लाभार्थी शालेय विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे)
  १.
नाशिक
  २७ १२ १२ १२ १२० ३२०
 
     
  वर्ष २०१७ - १८  
 
  क्र. ठिकाण सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या उपक्रमात समाविष्ट शाळांची संख्या समाविष्ट शाळांतील वर्गांची संख्या उपक्रमात समाविष्ट शासकीय शाळांची संख्या शाळांमधून घेण्यात आलेल्या कृतीसत्रांची संख्या

लाभार्थी शालेय विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे)

  १.
नाशिक
  ३० १५ १५ १० १५० ४००
  २.
मुंबई
  ५१ २५ २५ --- २५० १०००
  ३.
नंदुरबार
  २५ १० १० --- ९० ४५०
  एकूण (२०१७ - १८ मध्ये)   १०६ ५० ५० १० ४९० १८५०
 
     
  वर्ष २०१८ - १९  
 
  क्र. ठिकाण सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या उपक्रमात समाविष्ट शाळांची संख्या समाविष्ट शाळांतील वर्गांची संख्या उपक्रमात समाविष्ट शासकीय शाळांची संख्या शाळांमधून घेण्यात आलेल्या कृतीसत्रांची संख्या

लाभार्थी शालेय विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे)

  १.
नाशिक
  ४० २० २० --- २०० ५००
  २.
मुंबई
  ९० ६० ८२ ३१ ८२० ४१००
  ३.
धुळे
  २० १० १० १०० ३००
  ४.
नंदुरबार
  २० १० १० --- १०० ३००
  ५.
देवळा (जि. नाशिक)
  २० १० १० १०० ३००
  ६.
जळगाव
  १० ९० ४५०
  ७.
सोलापूर
  २४ १३ १३ --- १२९ ४००
  ८.
पंढरपूर (जि. सोलापूर)
  २५ १००
  ९.
गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)
  १८ --- ९० २७५
  १०.
बिद्री (जि. कोल्हापूर)
  १४ ७० २२०
  ११.
अमरावती
  १९ १० १० ९९ ५००
  १२.
निपाणी (जि. बेळगावी, कर्नाटक राज्य)
  १० ६० १५०
  एकूण (२०१८ - १९ मध्ये)   २९१ १६६ १८९ ४५ १८८९ ७५९५
 
     
  वर्ष २०१९ - २०  
 
  क्र. ठिकाण सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या उपक्रमात समाविष्ट शाळांची संख्या समाविष्ट शाळांतील वर्गांची संख्या उपक्रमात समाविष्ट शासकीय शाळांची संख्या शाळांमधून घेण्यात आलेल्या कृतीसत्रांची संख्या

लाभार्थी शालेय विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे)

  १.
नाशिक
  २२ १७ १७ १७ १७० ३५०
  २.
चांदवड (जि. नाशिक)
  १६ ८० ४९३
  ३.
देवळा (जि. नाशिक)
  ३८ १९ १९ १९० ७१४
  ४.
मालेगांव (जि. नाशिक)
  १८ ९० ५२२
  ५.
शिरसोंडी (जि. नाशिक)
  १८ --- ९० ६१८
  ६.
मुंबई (मोड्यूल २)
  ६४ ३२ ३२ १८ ३२० ११४२
  ७.
ईशान्य मुंबई
  २० १० १० १०० ४२५
  ८.
अंबरनाथ (जि. ठाणे)
  --- ४० २०९
  ९.
पुणे
  १२ --- ७० ३८५
  १०.
धुळे
  १८ १० १० --- १०० २६०
  ११.
साक्री (जि. धुळे)
  २० १० १० --- १०० ३७२
  १२.
चाळीसगांव (जि. जळगांव)
  १० --- ५० २३९
  १३.
जळगांव
  २२ ११ ११ --- १०५ ४०६
  १४.
सोलापूर
  ४० २० २० --- २०० ८६७
  १५.
बार्शी (जि. सोलापूर)
  --- ४० १८५
  १६.
पंढरपूर (जि. सोलापूर)
  १० --- ५० ३०५
  १७.
सांगोला (जि. सोलापूर)
  --- २० ७८
  १८.
अंबाजोगाई (जि. बीड)
  --- १८ ६८
  १९.
पानगांव (जि. लातूर)
  ४० २४६
  २०.
उमरी (जि. नांदेड)
  --- ४० १९३
  २१.
जालना
  १६ ७८ २७७
  २२.
आजरा (जि. कोल्हापूर)
  २० १० १० --- १०० ३७३
  २३.
बिद्री (जि. कोल्हापूर)
  १० --- ५० १९२
  २४.
चंदगड (जि. कोल्हापूर)
  २० १० १० १०० ४०९
  २५.
गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)
  २८ १४ १४ --- १४० ४४८
  २६.
कोल्हापूर
  १० ५० १८५
  २७.
वारणानगर (जि. कोल्हापूर)
  १६ --- ८० ५०७
  २८.
फलटण (जि. सातारा)
  २२ ११ ११ --- १०९ ४९८
  २९.
रत्नागिरी
  १० --- ५० १८०
  ३०.
अमरावती
  ३६ १८ १८ १८० ७५०
  ३१.
निपाणी (जि. बेळगावी, कर्नाटक राज्य)
  २० १० १० १०० ४४३
  एकूण (२०१९ - २० मध्ये)   ५७५ २९६ २९६ ६६ २९५० १२३३९
 
 

आत्तापर्यंत 'शनिवारी विज्ञानवारी' हा उपक्रम ५२४ शाळांमधून यशस्वीपणे राबविण्यात आला असून त्याचा फायदा २२००० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना झाला आहे.

(या उपक्रमाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल - वाचण्यासाठी येथे क्लिक करा)